Tap to Read ➤

या बॉलरनं केली गेलची बरोबरी; टेस्टमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारे ५ बॅटर

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉपला कोण?
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजासमोर सिंगल डबल्सवर भर देत आपली खेळी फुलवत क्षमता सिद्ध करण्याचं एक मोठं टास्क असते. इथं मोठी फटकेबाजी करण्यापेक्षा संयमी अंदाजात अधिक काळ टिकणं अपेक्षित असते.
पण, काही फलंदाज कसोटीतही आक्रमक अंदाजात खेळताना दिसते.
इथं नजर टाकुयात कसोटीत स्फोटक अंदाजात खेळ करून दाखवत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर
न्यूझीलंडच्या ताफ्यातून गोलंदाजाच्या रुपात खेळणाऱ्या टिम साउदीनं कसोटीत फलंदाजी करताना चक्क ख्रिस गेलला तोडीस तोड कामगिरी केली आहे. त्याच्या खात्यात कसोटी कारकिर्दीतील १०७ कसोटी सामन्यात ९८ षटकारांची नोंद आहे.
वेस्ट इंडिज स्टार ख्रिस गेलनं आपल्या कारकिर्दीतील १०३ कसोटी सामन्यात ९८ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने आपल्या कारकिर्दीतील ९६ कसोटी सामन्यात १०० षटकार मारले आहेत.
न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलम याने १०१ कसोटी सामन्यात १०७ षटकार मारले आहेत.
इंग्लंडचा बेन स्टोक्स हा कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वात टॉपला आहे. त्याच्या भात्यातून ११० सामन्यात १३३* षटकार पाहायला मिळाले आहेत.
क्लिक करा