आठवड्यातील हा दिवस केस कापण्यासाठी सर्वात शुभ, होईल भरभराट...!
कधीच पडणार नाही संपत्तीची कमी...
सनातन धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसासाठी काही नियम सांगितले आहेत. यात, कुठल्या दिवशी कोणते काम करावे आणि कोणते करू नये, हेही सांगितले आहे.
या नियमांचे पालन केल्यास जीवनात कधीही संपत्तीची कमतरता येत नाही. केस कापनेही एक असेच काम आहे.
हिंदू धर्मात केस कापण्यासाठी शुभ-अशुभ दिवस सांगितले आहेत. पण अनेक लोक याकडे दुर्लक्षही करतात. तर जाणून घेऊ यात, कोणत्या दिवशी केस कापने असते शुभ?
सोमवार - या दिवशी केस कापणे अशुभ मानले जाते. असे केल्यास मुलांना त्रास होतो. तसेच जातकाला मानसिक दुर्बलताही येते.
मंगळवार- या दिवशी केस कापल्याने आयुर्मान कमी होते. तर काही लोकांच्या मते मंगळवारी केस कापल्याने कर्जातून मुक्तता होते.
बुधवार - हा दिवस नाखे आणि केस कापण्यासाठी शूभ मानला जातो. बुधवारी केस कापल्याने संपत्तीत वाढ होते आणि जीवनातील आनंद वाढतो.
गुरुवार- या दिवशीही दाढी अथवा केस कापल्याने अशुभ फळ मिळते. यामुळे भगवान श्री विष्णु आणि माता लक्ष्मी नाराज होतात. धनहानी आणि मान-सन्मान हानी होण्याचे योग बनतात.
शुक्रवार - हा दिवस केस कापण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. शुक्रवारी नाखे आणि केस कापल्याने सौंदर्य वाढते. धन-वैभव वाढते आणि यश मिळते.
शनिवार - या दिवशी केस कापण्याची चूक करू नका. असे केल्यास, शनि देव नाराज होतात आणि जीवनात कष्ट येतात.
रविवार - या दिवशी केस कापल्यास धन, बुद्धी आणि धर्माचा नाश होतो. तसेच आत्मविश्वासही कमी होतो.
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी करत नाही.)