Tap to Read ➤

शनीदेवाचा आवडता मूलांक असलेले लोक असतात यशाच्या शिखरावर!

शनी देव ही न्यायाची देवता, ती ज्यांच्यावर कृपा करते त्यांचे नशीब फळफळते; चला त्यांच्या आवडत्या मूलांकाबद्दल जाणून घेऊ.
शनी देव यश देतात पण उशिराने, अशी त्यांची ख्याती आहे. पण ते ज्याच्या पाठीशी उभे राहतात त्यांना यशाच्या शिखरावर नेतात.
मकर, कुंभ या शनी देवाच्या राशी आहेत, तर शनी देवाचा आवडता मूलांक कोणता? चला जाणून घेऊ.
मूलांक म्हणजे आपल्या जन्मतारखेची बेरीज. ८ हा शनी देवाचा आवडता मूलांक आहे.
कोणत्याही महिन्याच्या ८,१७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.
मूलांक ८ हा न्याय देवता शनिदेवाशी संबंधित आहे.
मूलांक क्रमांक ८ असलेले लोक कठीण परिस्थितीतही घाबरत नाहीत, संघर्ष करतात आणि यशस्वी होतात.
हे लोक कमी बोलतात पण ज्यांच्याशी मैत्री करतात ते आयुष्यभर निभावतात.
८ मूलांकाच्या लोकांमध्ये नेतृत्त्वाचे गुण असतात. ते मोठे उद्योगपती, नेते आणि समाजसेवक बनतात. प्रसिद्धी मिळवतात.
मात्र यांची लव्ह लाईफ फार चांगली नसते, तरी हे लोक प्रेमाच्या बाबतीत एकनिष्ठ राहतात.
क्लिक करा