Tap to Read ➤
महिंद्रा थार नॅनोवर आदळली, हालत पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
सोशल मीडियावर एका रस्ते अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
टाटाच्या कार आणि त्यांचा मजबूतपणा यांचा कोणीही हात धरू शकत नाही, असे बोलले जाते
टाटांनी एक विदेशी कंपनी काय ताब्यात घेतली तर सर्व चारचाकी वाहनांचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
टाटांच्या नॅनोला लोकांनी नाकारले तरी ज्या थारची लोकांमध्ये क्रेझ आहे, तिची झालेली हालत पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.
महिंद्रा थार आणि टाटा नॅनोमध्ये हा अपघात छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात झाला. Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
थार रस्त्यावर उलटली आहे, तर नॅनो चक्क रस्त्यावर उभी आहे. नॅनोच्या पुढील भागाला किरकोळ नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर लोकांमध्ये कोणती कार अधिक मजबूत याबाबत अधिक चर्चा सुरू झाली आहे.
पद्मनापूर भागातील मिनी स्टेडियमजवळ थार वेगाने येत होती. दुसऱ्या बाजूला लाल रंगाची नॅनो कार जात होती.
दोन्ही वाहनांची धडक झाली, त्यात थार उलटली, आता नॅनोच्या धडकेत थार कशी काय उलटली, हा प्रश्न कारप्रेमींना पडलाय
क्लिक करा