Tap to Read ➤

आता अशी दिसतेय सलमान खानच्या 'तेरे नाम'मधील 'निर्जला'

बॉलिवूडमध्ये पहिलाच हिट चित्रपट दिल्यानंतर आता ती रुपेरी पडद्यापासून गायब झाली आहे.
अभिनेत्री भूमिका चावलाने सलमान खानच्या तेरे नाम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
या चित्रपटातील सलमान खान व भूमिकाचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं.
बॉलिवूडमध्ये पहिलाच हिट चित्रपट दिल्यानंतर आता ती रुपेरी पडद्यापासून गायब झाली आहे.
लग्नानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला आहे.
भूमिकाने हिंदीच नाही तर तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी व पंजाबी चित्रपटात काम केलं.
पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या भूमिकाचा पहिला चित्रपट युवाकुडु हा होता.
२००१ साली प्रदर्शित झालेल्या कुशी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
भूमिकाने अल्पावधीतच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं होतं.
त्यानंतर तिला तेरे नाम चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली.
त्यानंतर तिला हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या.
पण ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकल्या नाहीत.
क्लिक करा