Tap to Read ➤

मन:शांतीसाठी तुम्ही याच १० उपायांच्या शोधात तर नाही?

मन शांत असेल तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्थितीचा तुम्ही तटस्थपणे सामना करू शकता, त्यासाठी श्री श्री रवीशंकर यांनी सांगितले उपाय!
श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' चे फायदे तुम्ही ऐकले असतील; मन शांत ठेवण्याचे १० उपाय जाणून घेऊ.
अतिविचार वाईटच. मनाला वर्तमानात गुंतवून ठेवा, जेणेकरून ते भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून अस्वस्थ होणार नाही.
कामात मग्न असलेली व्यक्ती कायम प्रसन्न असते, याउलट ज्याच्याकडे काम नाही तिची व्यक्ती अस्थिरता अनुभवते.
जेव्हा मन एकाग्र असते, तेव्हा भय, अपराधीपणा आणि रागापासून मुक्त असते, तेव्हा कोणत्याही आजाराला बरे करण्याची शक्ती मनात असते.
जगाकडून मला काय मिळाले, यापेक्षा मी जगाला काय देऊ शकतो याचा विचार आणि त्यानुसार कृती करण्यात मन रमवा.
मन स्थिर असेल तरच तुम्ही आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्थितीचा सामना करू शकाल.
अपूर्णतेची जाणीव, आपल्याकडे असलेल्या उणीवांचा स्वीकार आपल्या मनाला अतिरिक्त ताणापासून दूर ठेवतो.
दुसऱ्यांवर प्रेम करतो, सहानुभूती बाळगतो, तेवढेच प्रेम स्वतःबद्दल असू द्या आणि आवश्यक तेवढी सहाभूतीही दाखवा.
काल काय झाले याचा विचार करण्यात आज वाया घालवू नका आणि उद्या काय होईल याचीही चिंता करू नका.
जेव्हा ताण सहन होत नाही तेव्हा 'ओम इग्नोराय नमः' म्हणत दुर्लक्ष करा, सगळ्याच गोष्टी आपल्या आवाक्यात नसतात हे मान्य करा.
कार्यमग्न जीवन ही शांत आणि स्थिर मनाची किल्ली आहे लक्षात ठेवा. वाट्टेल ती कामं करा, पण रिकामे राहू नका!
क्लिक करा