Tap to Read ➤

टीम इंडियानं जिंकली सातवी ICC ट्रॉफी, इथं पाहा खास रेकॉर्ड

भारतीय संघानं दुबईचं मैदान गाजवलं! कोणत्या संघानं सर्वाधिक वेळा कोरलंय  ICC ट्रॉफीवर नाव? जाणून घ्या सविस्तर
दुबईच्या मैदानात न्यूझीलंड संघाला पराभूत करत टीम इंडियाने सातव्यांदा आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले. भारतीय संघ सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय संघानं दोनवेळा वनडे वर्ल्ड कप (कपिल देव आणि धोनी कॅप्टन), दोन वेळा टी-२० वर्ल्ड कप (धोनी आणि रोहित कॅप्टन) आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकलीये. (सौरव गांगुली, धोनी आणि रोहित)
सर्वाधिक वेळा आयसीसी ट्रॉफी जिंण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. त्यांनी सहा वेळा वनडे वर्ल्ड कप, दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि प्रत्येकी १-१ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलीये.
कॅरेबियन संघ या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी पहिल्या दोन वनडे वर्ल्ड कपसह दोन वेळा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आणि एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर आपलं नाव कोरले आहे.
पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका हे तीन संघ ३ आयसीसी ट्रॉफीसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून न्यूझीलंडचा संघ २ आयसीसी ट्रॉफीसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत फक्त एक आयसीसी स्पर्धा गाजवलीये. १९९८ च्या पहिल्या हंगामात त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
क्लिक करा