Tap to Read ➤

Tata समूहाच्या झोळीत आणखी एक कंपनी, 2250 कोटी रुपयांचा करार...

या कंपनीतील 100 टक्के हिस्सा टाटा ग्रुपच्या TCS कडे जाणार आहे.
Tata group deal: टाटा समूहाची IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने एक मोठा करार केला आहे.
कंपनीने 11 मार्च रोजी 'दर्शिता सदर्न इंडिया हॅप्पी होम्स'चे 100 टक्के इक्विटी शेअर्स 2250 कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली.
टाटा समूह दर्शिताची जमीन आणि इमारतदेखील संपादित करेल. भविष्यात याला डिलिव्हरी सेंटर बनवले जाईल, जे बंगळुरुमध्ये स्थित असेल.
या डीलमध्ये दोन वर्षांनंतर संस्थेतील 100 टक्के इक्विटी शेअर्स घेण्याचा कॉल पर्याय आहे.
दर्शिता सदर्न इंडिया हॅपी होम्स सप्टेंबर 2004 मध्ये अस्तित्वात आली. ही व्यावसायिक मालमत्तेच्या विकासात गुंतलेली कंपनी आहे.
अलीकडेच TCS ने Vantage Towers सोबत भागीदारी केली आहे. ही युरोपमधील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम टॉवर ऑपरेटर आहे.
ही भागीदारी 86,000 साइट्सचे नेटवर्क व्यापणारे डिजिटल सेवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी करण्यात आली आहे.
टेलिकॉम टॉवरच्या स्थापनेसाठी जमीन भाड्याने देणाऱ्या मालकांच्या अनुभवात बदल घडवून आणणे, मालमत्ता मालकांसाठी सेवा प्रक्रिया सुलभ करणे...
प्रतिधारण दर वाढवणे आणि संपूर्ण युरोपमधील दूरसंचार साइट भागीदारी मजबूत करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
क्लिक करा