Tap to Read ➤

टॅक्स वाचवण्यासाठी 'या' पर्यायांमध्ये करू शकता गुंतवणूक

पाहा कोणते आहेत हे पर्याय. काय आहे खास.
तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर कोणत्या गुंतवणूकींवर तुम्ही टॅक्स वाचवू शकता याची माहिती ठेवायला हवी.
यासाठी असलेल्या पर्यायांवर तुम्हाला रिटर्नही चांगले मिळतील आणि टॅक्सची बचतही करता येईल.
तुम्ही एलआयसीची एक खास पॉलिसीही घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळू शकते.
नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एनपीएसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही टॅक्स वाचवू शकता. यात ८ ते १० टक्के रिटर्न मिळतात.
एनएससी ६.८ टक्क्यांच्या रिटर्नसह गुंतवणूकीची योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला करात सूट मिळते.
ईएलएसएसमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तीन वर्षांचा लॉक इन पिरिअड आहे. यामध्ये तुम्ही १२ ते १४ टक्के रिटर्नची अपेक्षा करू शकता.
पोस्ट ऑफिस किंवा बँकेत तुम्ही पाच वर्षांच्या एफडीमध्ये पैसे गुंतवू शकता. यामध्ये तुम्हाला कर सूट मिळते.
पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. १५ वर्षांच्या लॉक इन पीरिअडवाल्या या पर्यायात ७.१ टक्के व्याज मिळतंय.
क्लिक करा