Tap to Read ➤
खूप कमवा आणि मजा करा, या पाच देशांमध्ये भरावा लागत नाही इन्कम टॅक्स
नोकरदार वर्ग असो वा उद्योगपती कराचा बोजा हा सर्वांवर असतो. भारतासह बहुतांश देशांमध्ये सरकारच्या उत्पन्नाचा हा प्रमुक स्रोत आहे.
भारतामध्ये जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जातो तेव्हा संपूर्ण देशातील जनतेचं लक्ष इन्कम टॅक्सबाबत होणाऱ्या घोषणेकडे लागलेले असते.
जनता आपल्या उत्पन्नामधून ठराविक रक्कम कराच्या रूपात जमा करत असते. मात्र जर कुठल्याही कराविना उत्पन्न तुमच्या हातात आलं तर काय होईल.
जगात असे काही देश आहेत जिथे सरकार जनतेकडून कराच्या रूपात एक पैसाही घेत नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे खरं आहे.
या यादीतील पहिलं नाव आहे संयुक्त अरब अमिराती (UAE). जगभरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा हा देश जनतेकडून कर वसूल करत नाही.
यूएईप्रमाणेच तेल आणि गॅसच्या साठ्यांनी समृद्ध असलेल्या कुवेतमध्येही सरकार आपल्या देशातील नागरिकांकडून कर वसूल करत नाही.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
नागरिकांकडून कर वसूल न करणाऱ्या देशांमध्ये बहामास देशाचाही समावेश आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशात कर वसुली केली जात नाही.
तेल आणि गॅसचे प्रचंड साठे असलेल्या ओमानची गणना श्रीमंत देशांमध्ये होते. येथील सरकारसुद्धा आपल्या नागरिकांच्या उत्पन्नावर कर आकारत नाही.
कतारचा समावेशही करमुक्त देशांच्या यादीत होतो. येथील सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य मार्ग हा तेलाचे साठे हा आहे.
क्लिक करा