Tap to Read ➤

महिन्याभरात १३८० कोटींचा नफा, टाटांच्या शेअरनं झुनझुनवालांना फायदा

टाटांच्या या शेअरमुळे सरकारी कंपनी एलआयसीलाही मोठा फायदा झालाय.
टाटा समूहाची कंपनी टायटनच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानं रेखा झुनझुनवाला यांच्या नफ्यात वाढ झाली.
टायटनच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानं रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत अवघ्या एका महिन्यात १३८० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
टायटनच्या शेअर्सनं गुरुवारी 3299.70 रुपयांचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठला. दरम्यान, एलआयसीलाही टायटनच्या समभागांच्या वाढीचा चांगला फायदा झाला आहे.
महिन्याभरापूर्वी 14 ऑगस्ट 2023 रोजी, टायटनचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर 3009.75 रुपयांवर होते. 14 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 3299.70 रुपयांवर पोहोचले.
टायटनच्या शेअर्समध्ये एका महिन्यात 290 रुपयांनी वाढ झाली. जून 2023 तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,75,95,970 शेअर्स किंवा कंपनीमध्ये 5.36 टक्के हिस्सा आहे.
एका महिन्यात टायटनच्या शेअर्समध्ये 290 रुपयांची वाढ झाल्यानं रेखा झुनझुनवाला यांना एकूण 1380 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. म्हणजेच एका महिन्यात त्यांची संपत्ती 1380 कोटींनी वाढली.
एलआयसीलाही टायटनच्या शेअर्सच्या वाढीचा मोठा फायदा झाला आहे. जून 2023 तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एलआयसीकडे टायटनचे 1,56,86,771 शेअर्स किंवा कंपनीमध्ये 1.77 टक्के हिस्सा आहे.
टायटनचे शेअर्स एका महिन्यात 290 रुपयांनी वाढले आहेत. त्यानुसार एलआयसीच्या एकूण संपत्तीत 454 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. गुंतवणूकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
क्लिक करा