Tap to Read ➤

Jio Cinema वर मोफत पाहता येणार IPL

मुकेश अंबानींचा मास्टरस्ट्रोक
रिलायन्स जिओनं बाजारात एन्ट्री घेतल्यानंतर सर्वच दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
कंपनी आपल्या ग्राहकांना JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या ॲॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.
आता मुकेश अंबानींच्या मालकीची Viacom 18 देशांमध्ये IPL 2023 चे मोफत स्ट्रीमिंग प्रदान करेल.
रिलायन्सने इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2023) स्ट्रीमिंग अधिकार सुमारे 23,758 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
डिस्ने प्लस हॉटस्टार आणि ॲमेझॉन प्राइमला पछाडत वायकॉम 18 ने प्रथमच IPL चे स्ट्रीमिंग अधिकार मिळवले आहेत.
आयपीएलचे सामने मोफत पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी, आयपीएल चाहत्यांना सामने पाहण्यासाठी हॉटस्टार सबस्क्रिप्शन स्कीमसाठी पैसे द्यावे लागत होते.
जरी Jio आपल्या वापरकर्त्यांना JioCinema वर सामना विनामूल्य पाहण्याची ऑफर देत आहे. परंतु कंपनीकडे एक मास्टरस्ट्रोक आहे. पैसे कमविण्यासाठी डेटाचा प्रचंड वापर.
याशिवाय कंपनीचे लक्ष जाहिरातींवरही असून आयपीएलदरम्यान कंपनी मोठ्या जाहिरातदारांशी व्यवहार करेल, असे म्हटले जात आहे.
क्लिक करा