Tap to Read ➤
९ लाख कुटुंबांचं पोट भरतो टाटा समूह, टॉप ५ रोजगार देणाऱ्या कंपन्या
पाहा कोणत्या आहेत सर्वाधिक रोजगार देणाऱ्या देशातील खासगी क्षेत्रातील ५ प्रमुख कंपन्या.
भारतात खासगी क्षेत्रातील टाटा समूह हा सर्वात मोठा एम्पलॉयर आहे. ९.३५ लाख लोकांना रोजगार देणारा हा समूह आहे.
टाटा समूहातील सर्वात मोठी जॉब देणारी कंपनी म्हणजे टीसीएस. यामध्ये ६ लाखांपेक्षा अधिक लोक काम करतात.
क्वेस कॉर्पोरेशन - कदाचित या कंपनीबद्दल तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. परंतु ही कंपनी ३.८३ लाख लोकांना रोजगार देते.
मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३.५ लाखांपेक्षा अधिक आहे.
आयटी क्षेत्रातील आणखी एक कंपनी इन्फोसिस ३.३५ लाख लोकांना नोकरी देते. आयकर विभागाची नवी साईट याच कंपनीनं तयार केलीये.
अॅक्सेंचर - मूळ आयर्लंडची ही कंपनी भारतातही मोठ्या प्रमाणात काम करत आहे. भारतात या कंपनीचे जवळपास ३ लाख कर्मचारी आहेत.
क्लिक करा