Tap to Read ➤
चालताही येईना... हाय हिल्समुळे अभिनेत्रीला झाला गंभीर आजार
"तो खूप कठीण काळ होता, माझ्या पाठीत सतत वेदना, मला चालताही येत नव्हतं"
छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री तनाज इराणीने धक्कादायक खुलासा केला आहे.
तनाज आरोग्याशी संबंधित एका गंभीर समस्येतून गेली आहे. तिच्या करिअरवरही वाईट परिणाम झाला.
सध्या सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'बरसातें- मौसम प्यार का' या टीव्ही शोमध्ये तनाज दिसत आहे.
'कहो ना प्यार है', 'मेरे यार की शादी है', 'दीवांगी' सारख्या अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केलं आहे.
अभिनेत्रीने सांगितलं की, पाठीला गंभीर दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तनाजने कामातून ब्रेकही घेतला.
"मला कोणाकडूनही सहानुभूती नको आहे, म्हणून मी याबद्दल कोणाला सांगितले नाही."
"सतत काम केल्यामुळे आणि हाय हिल्समुळे मला L4 आणि L5 स्लिप डिस्कचा त्रास झाला."
"माझ्या पाठीत सतत वेदना होत होत्या, मला चालताही येत नव्हतं, काठीच्या साहाय्याने उभी राहत होते."
"तो खूप कठीण काळ होता पण फिजिओथेरपीमुळे मी बरी झाली आणि आता कामावर परतली."
"कठीण काळात मुलं, पती, संपूर्ण कुटुंबाची साथ मिळाली आणि आत्मविश्वास परत आला" असं तनाजने म्हटलं आहे.
क्लिक करा