शेताच्या बांधावरचं झाडही मिळवून देतंय २० हजार; तुम्ही लावले का?
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेली ही संकल्पना...असमतल, हलक्या जमिनीत हमखास पैसा
बांधावर झाडाची लागवड त्यात फळझाडेही लागवड केल्यानंतर तेही शेतकऱ्यांना उत्पन्न देते.
ग्रामीण भागात चिंचेची अनेक झाडे दिसतात. चिंचांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो
बहुतांश झाडे बांधावर, नाल्या-रस्त्यांच्या कडेला आणि वस्तीवर आहेत. काहींनी बांधावर जाणीवपूर्वक चिंचांची झाडाची लागवड केली.
चिंचेचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षाआड साधारणतः एक झाड वर्षाकाठी २० हजारांचे उत्पन्न देते
एका हंगामात एक झाड ५ ते ७ क्विंटल चिंचांचे उत्पादन देते. तर काही झाडांची १० ते १५ क्विंटलपर्यंतही उत्पादन क्षमता असते.
खाद्य पदार्थात सांबार, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो.
झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात.
बाजार समितीत चिंच विकल्यास किलोला २० ते २६ रुपये, तर चिंचोक्याला ६ ते ८ रुपये दर मिळतो.
चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते. चिंच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊस मानाच्या प्रदेशात चांगले वाढते.