रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
आपल्या टी-२० कारकिर्दीत हिटमॅन रोहित शर्मानं अनेक विक्रमाला गवसणी घातलीये. त्यातील एक रेकॉर्ड आहे तो सर्वाधिक सिक्सरचा.
रोहित शर्मानं २००७ ते २०२४ या कालावधीत १५१ डावात २०५ षटकार मारले आहेत.
रोहित शर्मा पाठोपाठ या यादीत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचा नंबर लागतो. त्याने २००९ ते २०२२ या कालावधीत त्याने १७३ षटकार ठोकले आहेत.
वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅटर निकोलस पूरन याने आतापर्यंत १४० षटकार ठोकले आहेत. जर तो आणखी ३०-४० सामन्यात अगदी तोऱ्यात खेळला तर तो रोहित शर्माचा रेकॉर्ड मागे टाकू शकतो.
निकोलस पूरनला कडवी टक्कर देण्यासाठी सूर्यकुमारही या शर्यतीत आहे. आतापर्यंत ६८ डावात सूर्यकुमार यादवच्या भात्यातून १३६ षटकार आले आहेत. तोही रोहितचा रेकॉर्डचा अगदी वेगाने पाठलाग करतोय.