Tap to Read ➤

आली नवीकोरी मारूतीची इलेक्ट्रिक कार; २३० किमी रेंज, किंमत फक्त...

भारतीय बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे
देशात EV वाहनात सध्या टाटा कंपनी प्रसिद्ध आहे तर दुसरीकडे अनेक परदेशी कंपन्याही EV मार्केटमध्ये उतरल्या आहेत.
त्यात मारूती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारची उत्सुकता सर्वांना आहे. आता लवकरच बाजारात मारूतीची नवी कोरी EV दाखल होईल
मारूती सुझुकीनं भारतात eWX डिझाईन पेटेंट केले आहे. ही तीच कार, मागील वर्षी टोक्यो मोटर शोमध्ये कॉन्सेप्ट लॉन्च केली होती.
Suzuki eWX ची लांबी केवळ ३.४ मीटर आहे. बॉक्सी आणि टॉल ब्वॉय डिझाईन वाली ही कार Wagon R सारखी दिसते.
सध्या कंपनीनं ही कार कॉन्सेप्ट म्हणून पुढे आणलीय. त्याचे उत्पादन अद्याप बाकी आहे. या कारमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात.
पेटेंट डिझाइन पाहिली तर कर्व्ड विंडशील्ड दिलंय, कारमध्ये फ्रंटपासून साइडप प्रोफाइल क्लॅडिंग दिली गेलीय.
Suzuki नं स्पेसिफिकेशन शेअर केले नाहीत. परंतु सिंगल मोटर सेटअपसह एका चार्जमध्ये २३० किमी रेंज धावू शकते.
कंपनी आधी Maruti Evx लॉन्च करेल. ज्यात ६० Kwh बॅटरी पॅक मिळेल. ही कार ५५० किमी रेंज देईल.
Maruti eVX तुलनेत eWX खूप छोटी आहे. त्यामुळे किंमत १०-१२ लाखांपेक्षा कमी राहील. बाजारात तिची स्पर्धा Tiago EV शी असेल.
क्लिक करा