Tap to Read ➤

दुबईत सूर्यासोबत दिसला त्याचा 'चंद्र'; रितिकाचे फोटोही होताहेत व्हायरल

भारत-पाक सामन्यावेळी रितिकासह या मंडळींच्या झलक ठरली लक्षवेधी
दुबईच्या मैदानात रंगलेल्या भारत-पाक सामन्यावेळी भारतीय कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिकाचा खास अंदाज पाहायला मिळाला.
रोहित शर्माची फटकेबाजी पाहताना रितिकाचा आनंद गगनात मावेना, असा सीनही दिसून आला.
बीसीसीआयने फॅमिलीला सोबत नेण्यास मनाई केल्यावर चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान  एका सामन्यासाठी फॅमिलीला नियम शिथील करण्यात आला होता.  रितिकाने  भारत-पाक सामन्याला पसंती दिल्याचे दिसले. ती लेक समायरासोबत या सामन्याचा  आनंद घेताना स्पॉट झाले.
रोहित शर्माची पत्नी रितिका आणि सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा यांच्यात खास बॉन्डिंग आहे. त्याची झलक भारत-पाक सामन्यावेळी पुन्हा पाहायला मिळाली.
सुर्यकुमार यादव पत्नी देविशासह सामन्याचा आनंद घेताना स्पॉट झाले.  स्टँडमध्ये या जोडीसोबतच  रितिका आणि तिची मुलगी समायराही बसल्याचे पाहायला मिळाले.
बीसीसीआयने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सामन्याला उपस्थितीत राहून लक्षवेधी ठरलेल्या चेहऱ्यांची झलक शेअर केली आहे. यात युवा क्रिकेटर तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांचीही झलक पाहायला मिळाली.
भारत-पाक सामन्या वेळी स्टेडियम स्टँडमध्ये स्पॉट झालेल्या चर्चित चेहऱ्यांमध्ये ब्रिटीश सिंगर जॅस्मिन वालियाचाही समावेश आहे. तिचे नाव आता भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जोडले जात आहे.
क्लिक करा