PICS: जय भोलेनाथ...! रैनानं दैवी आशीर्वादानं केली नवीन वर्षाची सुरूवात
आज सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने 'जय भोलेनाथ' म्हणत नवीन वर्षाची सुरूवात केली.
"दैवी आशीर्वादाने वर्षाची सुरुवात... नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी आणि पहिल्याच दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केला. सर्वांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, जय भोलेनाथ", असे त्याने कॅप्शनध्ये लिहिले.
रैनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
रैना क्रिकेटपासून दूर असला तरी समालोचन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो.
रैनाचा हा धार्मिक अवतार चाहत्यांना आकर्षित करत आहे.