Tap to Read ➤

मनाचे नकारात्मक विचार काढून टाकल्यास, कसा आहे आजचा हायव्होल्टेज SUNDAY

आजचे राशीभविष्य, दुपारनंतर अनेकांच्या आयुष्यात बदल होणार...
एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. एखाद्या स्त्रीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
दुपार नंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. आर्थिक देवाण - घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्यास, कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकेल. आर्थिक लाभ संभवतात.
कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल. आरोग्यात सुधारणा होईल.
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी उदभवतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते. पत्नी व संतती संबंधित लाभ होतील.
दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात अनुकूलता लाभेल.
संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. प्रतिस्पर्धी व विरोधक ह्यांच्याशी वाद संभवतात. नवीन कार्यारंभात अडचणी निर्माण होतील. महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.
दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. काही ना काही कारणाने संताप वाढेल व त्यामुळे कुटुंबीय व सहकारी ह्यांचे मन दुखावेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील.
शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. दुपार नंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकाल.
घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणाने आपल्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विरोधकांवर मात करू शकाल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.
क्लिक करा