अदानींची नोकरी सोडून सुरु केला व्यवसाय; आज कंपनीची किंमत कोटींमध्ये
१७ हजारात सुरु केला व्यवसाय
बिहारमधल्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी सुपरफूड मखानाचा उल्लेक केल्यापासून ते जोरदार चर्चेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस मखाना खात असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर आता बिहारच्या श्रवण कुमार रॉय यांनी योग्य नियोजनाने काम केल्यास शेतीशी संबंधित व्यवसायातही चांगला नफा मिळवता येतो हे सिद्ध केलं
श्रवण कुमार रॉय हे २०१९ मध्ये अदानी ग्रुपमध्ये काम करत होते. त्यांचा वार्षिक पगार आठ लाख रुपये होता. त्यावेळी त्यांनी पत्नीला आपण गावी येत असल्याचे सांगितले.
त्यावर त्यांच्या पत्नीने, लोकं खेड्यातून शहरात पैसे कमावण्यासाठी येतात आणि तुम्ही एवढी चांगली नोकरी सोडून गावाला जायचं आहे का?, असं विचारलं होतं.
त्यावर श्रवण कुमार यांनी "मला दोन वर्षांचा वेळ दे, मी माझ्या सध्याच्या पगाराइतके पैसे मखाना व्यवसायातून मिळवून देईल, असं म्हटलं.
गावी परतल्यानंतर त्यांनी मखान्याचा व्यवसाय सुरू केला. पण लॉकडाऊन लागल्याने श्रवण यांना आपल्या बचतीवर अवलंबून राहावे लागले.
मात्र आता श्रवण यांची कंपनी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मखाना आधारित स्नॅक्स बनवत आहे. त्यांचे मखनाचे पीठ कुकीज, इडली, डोसा आणि कुल्फी यासारख्या गोष्टींमध्ये वापरले जाते.
एकेकाळी मिथिला आणि बिहारपर्यंत मर्यादित असलेल्या मखाना आता सुपर फूड म्हणून जगभर प्रसिद्ध झाल्याचे श्रवण कुमार रॉय सांगतात.
श्रवण यांनी आपल्या मखाना कंपनीमध्ये २२ प्रकारची उत्पादने तयार केली आहेत. यापैकी मखाना कुकीज लोकप्रिय आहेत.
श्रवण यांनी १७ हजार रुपयांपासून मखाना व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांहून अधिक आहे.