दगडावर हातोडा मारला आणि तो घंटेसारखा आवाज करू लागताे, असं तुम्ही ऐकलं, पाहिलं आहे का?
काही ठिकाणी दगडातून असा आवाज येताे, या दगडांना म्हणतात Singing Rocks किंवा Ringing Rocks.
या दगडांवर मारल्यावर ते धातूसारखा आवाज निर्माण करतात. कधी कधी तर ट्युनिंग फोर्कसारखा टोन ऐकू येतो.
अमेरिकेत Pennsylvania राज्यात Ringing Rocks Park हा यासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण डोंगरावर पसरलेले असे हजारो दगड तिथं पाहायला मिळतात.
हे दगड सामान्य नाहीत. त्यात उच्च प्रमाणात लोह (iron content) असतं, म्हणूनच ते ध्वनी निर्माण करू शकतात.
सर्व दगड वाजतातच असं नाही. फक्त काही विशिष्ट रचनेचे दगडच संगीत निर्माण करतात.
जर हे दगड तिथून उचलून इतरत्र नेले, तर ते आवाज करणे थांबवतात. शास्त्रज्ञ अजूनही या रहस्याचा शोध घेत आहेत.
विज्ञान सांगतं, धातू आणि दगडातील क्रिस्टल संरचना हाच खरा कारणीभूत घटक आहे. त्यामुळे दगडांमधून संगीत निर्माण हाेतं.
अशा Singing Rocks जगात इतरत्रही आढळतात,आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील काही भागांमध्येही असे दगड आहेत.