Tap to Read ➤

व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्याइतकंच सोपं आहे पैसे पाठवणं

Whatsapp Pay ला कसा ॲड कराल अकाऊंट
WhatsApp पेमेंट फीचर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) विकसित केलेल्या UPI वर आधारित आहे. यावरही इतर ॲप्स प्रमाणे पेमेंट करता येतं.
पैशांच्या व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. WhatsApp द्वारे पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला बँक खातं मात्र जोडावं लागतं. पाहू हे कसं करता येतं.
सर्व प्रथम, व्हाट्सअॅप उघडा आणि ३डॉट्स (⋮) वर क्लिक करा आणि पेमेंट्स ऑप्शनवर जा.
आता Add a payment method या पर्यायावर क्लिक करा.
Accept and Continue वर क्लिक करा आणि पुढील स्टेपमध्ये बँकांच्या लिस्टमधून तुमचं खातं ज्या बँकेत आहे ती बँक निवडा.
बँक खातं WhatsApp पेमेंटशी लिंक करण्यासाठी, Verify वर क्लिक करा आणि ज्यासोबत तुमचं WhatsApp आणि बँक खाते दोन्ही लिंक आहेत तो मोबाईल नंबर निवडा.
तुमचा नंबर तुमच्या बँकेत व्हेरिफाय केला जाईल. तुमच्या खाते क्रमांकानुसार, तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ज्या खात्यातून पेमेंट करायचे आहे ते निवडा.
हे केल्यानंतर तुम्हाला UPI आयडी तयार करण्यास सांगितले जाईल. यासाठी तुमच्याकडे एटीएम कार्ड असणे आवश्यक आहे.
पण जर तुम्ही आधीच UPI आयडी बनवला असेल, तर तुम्हाला इथे फक्त पिन टाकावा लागेल, त्यानंतर तुम्ही सहज पेमेंट करू शकाल.
UPI आयडी तयार करण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि एक्सपायरी डेट टाका आणि त्यावर क्लिक करा. Verify Card वर क्लिक करा.
आता तुमच्या फोनवर मिळालेला ओटीपी Enter OTP मध्ये आणि तुमचा नवीन UPI ​​पिन Set UPI PIN मध्ये एंटर करा आणि खाली दिलेल्या टिक आयकॉनवर क्लिक करा.
आता पुढील स्क्रीनमध्ये, तुम्ही तयार केलेला युपीआय पिन पुन्हा एंटर करा आणि त्याची पुष्टी करण्यासाठी टिक मार्कवर क्लिक करा. तुम्ही हे करताच तुमचे बँक खाते WhatsApp पेमेंटशी लिंक केले जाईल.
क्लिक करा