Tap to Read ➤

IPL 2025 Opening Ceremony : बॉलिवूडमधील या कलाकारांचा दिसणार जलवा!

आयपीएल २०२५ स्पर्धेच्या १८ व्या हंगामाची सुरुवात ही कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात रंगणाऱ्या गत चॅम्पियन्स KKR विरुद्ध RCB यांच्यातील लढतीनं होणार आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदाही जगातील सर्वात मोठ्य़ा स्पर्धेची सुरुवात ही धमाकेदार उद्घाटन सोहळ्यासह होणार आहे.
आयपीएल २०२५ च्या उद्घाटन सोहळ्याच्या  कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांचा जलवा पाहायला मिळेल.
भारतीय गायक आणि संगीतकार अरिजीत सिंग याने आपल्या आवाजानं मोठा चाहतावर्ग कमावला आहे. यंदाच्या आयपीएल उद्घाटन सोहळ्यात तोही आपल्या आवाजानं स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करताना दिसेल, अशी माहिती समोर येत आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूरही आयपीएलच्या रंगारंग कार्यक्रमात वेगळा रंग भरताना दिसू शकते.
आयपीएल २०२५ च्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या चर्चित चेहऱ्यांमध्ये अभिनेता वरुण धवनच्या नावाचाही समावेश आहे.
गायिका श्रेया घोषालही आयपीएल २०२५ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात कलाकारीचा नजराणा पेश करून मैफिल लुटण्यास सज्ज आहे, अशी चर्चा रंगतीये.
ईडन गार्डन्सच्या मैदानातील सलामीच्या लढतीआधी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात हॉट अँण्ड ब्युटी दिशा पटानीचाही जलवा पाहायला मिळेल, अशीही माहितीही समोर येतीये.
क्लिक करा