Tap to Read ➤

Starlink : भारतात स्पीड किती मिळेल? किंमत काय असेल? जाणून घ्या...

Starlink India: लवकरच भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरू होणार आहे.
Elon Musk Starlink India: इलॉन मस्क अनेक दिवसांपासून त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा Starlink भारतात सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठीच त्यांनी भारतात प्रवेश करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे.
स्टारलिंकने एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दूरसंचार कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. दरम्यान, भारतात स्टारलिंकची सेवा सुरू झाल्यानंतर स्पीड किती मिळेल आणि यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील? असा प्रश्न विचारला जात आहे.
सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर इलॉन मस्कची स्टारलिंक भारतात आपली सेवा देण्यास सुरुवात करेल. स्टारलिंकने एअरटेल आणि जिओसोबत केलेल्या करारानुसार या दोन्ही कंपन्या स्टारलिंक कंपनीचे उपकरणे त्यांच्या रिटेल स्टोअरमध्ये विकतील.
स्टारलिंककडे स्टँडर्ड, प्रायोरिटी, मोबाइल आणि मोबाइल प्रायोरिटी सर्व्हिसेस प्लॅन्स आहेत. स्टँडर्ड योजनेत 25 ते 100Mbps डाउनलोड आणि 5 ते 10Mbps अपलोड स्पीड मिळेल. प्रायोरिटी योजनेत 40 ते 220Mbps डाउनलोड आणि 8 ते 25Mbps अपलोड स्पीड मिळेल.
तसेच, मोबाइल प्लॅनमध्ये 5 ते 50Mbps डाउनलोड आणि 2 ते 10Mbps अपलोड स्पीड मिळेल. तर, मोबाइल प्रायोरिटी प्लॅनमध्ये 40 ते 220Mbps डाउनलोड आणि 8 ते 25Mbps अपलोड स्पीड मिळेल.
अमेरिकेत स्टारलिंक मासिक योजनेची किंमत $ 120 (अंदाजे रु. 10,441) पासून सुरू होते. उपकरणाची किंमत $599 (अंदाजे रु 52120). भारतातील स्टारलिंक प्लॅनच्या किंमतीबद्दल काहीही सांगणे खूप घाईचे ठरेल. किमतींबद्दल अचूक माहिती स्टारलिंकने भारतात पदार्पण केल्यानंतरच कळेल.
दुसरीकडे, रिलायन्स जिओ फायबर प्लॅनची ​​किंमत 399 ते 8499 रुपयांपर्यंत आहे आणि जिओ एअरफायबर प्लॅनसाठी 599 ते 3999 रुपये मोजावे लागतील. जिओ फायबर आणि एअर फायबर प्लॅन 30Mbps ते 1Gbps पर्यंतच्या स्पीडसह उपलब्ध आहेत.
क्लिक करा