Tap to Read ➤

पाक गड्याला 'धोबी पछाड'; Kamindu Mendis नं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

एक नजर वर्ल्ड रेकॉर्ड सेट करताना त्याने खेळलेल्या शानदार खेळीच्या रेकॉर्ड्सवर
श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस याने न्यूझीलंड विरुद्धच्या गाले कसोटी सामन्यात नना वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
कसोटीत पदार्पण केल्यापासून सलग आठव्या सामन्यात त्याने सातत्याने ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम करून दाखवलाय. एक नजर त्याने खेळलेल्या शानदार खेळीच्या रेकॉर्ड्सवर
२०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने ६१ धावांची खेळी केली होती.
पदार्पणाच्या सामन्यानंतर थेट २०२४ मध्ये तो बांगलादेश दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरला. मार्च २०२४ मध्ये बांगलादेश विरुद्ध त्याने पहिल्या डावात १०२ धावा तर दुसऱ्या डावात १६४ धावांची खेळी केली होती.
३० मार्च २०२४ रोजी श्रीलंकन संघ बांगलादेश दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ९२ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले.
१४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत श्रीलंकेच्या संघाने इंग्लंडचा दौरा केला. यावेळी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ११३ धावांची खेळी केली.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने दमदार खेळ दाखवत ५० प्लसचा सिलसिला कायम ठेवत ७४ धावांची खेळी केली. तर तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात त्याच्या भात्यातून ६४ धावांची खेळी आली होती.
श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ११४ धावांसह पाकिस्तानच्या सौद शकिल याने सलग सात कसोटी सामन्यात ५० + धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
त्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने सलग आठवे कसोटी अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला.
क्लिक करा