Tap to Read ➤

चलेया.. गाण्यावर नृत्य करणाऱ्या सुश्मिाताला सलाम!

कृत्रिम पाय असलेल्या एका दिव्यांग महिलेनं केलेले नृत्य म्हणता म्हणता सोशल मीडियात व्हायरल झाले.
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी असतील तर, कितीही संकटे आली तरी जगणं आनंदाने जगता येतं याचं एक उदाहरण आहे हा व्हिडिओ.
डान्स लाइक नोबडी इज वॉचिंग असं म्हणतात ते हा व्हायरल व्हिडिओ पाहून अगदी पटतं.
सध्या शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील 'चलेया' हे गाणं खूप व्हायरल झालं आहे.
याच व्हायरल झालेल्या गाण्यावर सुश्मिता चक्रवर्ती यांनी नृत्य केले आहे.
त्यांचा हा व्हिडिओ गायिका शिल्पा रावने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
त्यांचा नृत्याचा आनंद, अदा आणि उत्साह अतिशय दांडगा आहे.
ते नृत्य पाहून अनेकांना वाटले की ही महिला आणि तिची उमेद अत्यंत प्रेरणादायी आहे.
जेव्हा केव्हा आपण नाउमेद होतो तेव्हा जरुर असे व्हिडिओ पाहावे.
क्लिक करा