सोन्यात गुंतवणूक करायची? 'या' बँका देताहेत मोठी संधी, असा करा अर्ज...
तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर चांगली संधी आहे. सध्या अनेक सरकारी आणि खाजगी बँका सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत स्वस्त दराने सोनं देत आहेत.
सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत सोन्याची किंमत बाजारभावाच्या तुलनेत कमी आहे. तुम्ही सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत सोनं खरेदी केले तर तुम्हाला आगामी काळात चांगला परतावा मिळेल.
सध्या बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 59990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत बँका 5,923 रुपये प्रति ग्रॅम दराने सोन्याची विक्री करत आहेत.
याचा अर्थ असा की, जर तुम्ही सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत 10 ग्रॅम सोने खरेदी केले तर ते बाजार दरापेक्षा 760 रुपये स्वस्त असेल. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना 50 रुपये प्रति ग्रॅमची अधिक सूट मिळेल. यासाठी HDFC, SBI, PNB, कॅनरा आणि ICICI बँकेकडून सोनं खरेदी करू शकता.
तुमची इच्छा असल्यास तुम्ही SBI नेट बँकिंगद्वारे SGB ऑनलाइन खरेदी करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल.
नोंदणी करण्यासाठी तुम्हाला SBI नेट बँकिंगमध्ये लॉग इन करावे लागेल. यानंतर ई-सेवा पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सॉवरेन गोल्ड बाँडचा पर्याय निवडा.
आता भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जा. मग नोंदणी फॉर्म योग्यरित्या भरा आणि सबमिट करा.
तुम्ही ICICI बँकेच्या नेट बँकिंगद्वारे SGB ऑनलाइन खरेदी करू शकता. यासाठी ICICI नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा. यानंतर गुंतवणूक आणि विमा पर्याय निवडा. त्यानंतर, गोल्ड बाँड निवडा आणि नंतर पेमेंट करा.