Tap to Read ➤

सोनं ९० रुपये तोळा होतं, तेव्हा 'ही' अभिनेत्री घ्यायची २५ हजार फी

या टॉप अभिनेत्रीनं असिस्टेंट डायरेक्टरशी घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं
१९४०-५० च्या दशकात देशात ९० रुपये तोळा सोनं विकत मिळायचं तेव्हा एक अभिनेत्री २५ हजार फी घ्यायची.
या अभिनेत्रीचे नाव आहे पालिवई भानुमती रामकृष्ण, हे नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल.
भारतीय सिने इतिहासातील ही सर्वात महागडी होती. तिची फी फिल्म बजेटच्या ५० टक्के असायची.
६० वर्षाच्या करिअरमध्ये भानुमती यांनी ९७ तामिळ-तेलुगू आणि हिंदी सिनेमात काम केले आहे.
इतकेच नाही तर भानुमती या पहिल्या साऊथ अभिनेत्री आहेत, ज्यांना १९६६ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
अभिनेत्री, दिग्दर्शकासोबतच भानुमती या सिंगर, फिल्म प्रोड्युसर, म्युझिक कंपोजर आणि नॉवेलिस्टही होत्या.
भानुमती यांच्या लग्नाची कहाणीही प्रसिद्ध आहे. प्रेमात त्यांनी घरातून पळून जात असिस्टेंट डायरेक्टरसोबत लग्न केले.
सामान्य कुटुंबात जन्मलेली भानुमती यांनी लहानपणापासून स्टेज परफॉर्म करत सिनेमाच्या जगतात पाऊल ठेवले होते.
१९३९ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी भानुमती यांना विक्रांतम या पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाली होती.
१९५३ मध्ये भानुमती डायरेक्टर बनल्या, सिनेइंडस्ट्रीत सिनेमा दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक फिल्मचे डायरेक्शन केले.
क्लिक करा