तिच्या निर्णयामुळं वाढलं स्मृती मानधनाचं टेन्शन; नेमकं काय घडलं?
WPL च्या आगामी हंगामाआधी RCB च्या संघाला मोठा धक्का, जाणून घेऊयात त्यासंर्भातील सविस्तर स्टोरी
महिला प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाआधी स्मृती मानधना अन् गतविजेत्या तिच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
आरसीबी महिला संघाच्या ताफ्यातील स्टार ऑलराउंडर सोफी डिव्हाईन हिने अचानक क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे ती आता न्यूझीलंडसह आगामी WPL हंगामात खेळताना दिसणार नाही.
महिला टी-२० वर्ल्डकपासून सोफी सातत्याने क्रिकेट खेळत आहे. तिनं अनिश्चित काळासाठी घेतलेल्या ब्रेकचा निर्णयाचे आरसीबीसह न्यूझीलंडच्या संघानेही समर्थन केले आहे.
आरसीबीनं गत हंगामात महिला प्रीमिअर लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. संघाच्या यशात सोफीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
गत हंगामात तिने १० सामन्यात १३६ धावांसह ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे यावेळी आरसीबीच्या संघाला तिची मोठी उणीव भासू शकते.
स्टार ऑलराउंडर आगामी हंगामातून आउट झाल्यावर आरसीबीच्या संघानं अद्याप तिची रिप्लेसमेंट शोधलेली नाही.
स्मृती मानधनासह आरसीबी संघासाठी तिची उणीव भरून काढण्याचे मोठे चॅलेंज असेल. ही गोष्टी संघासह स्मृती मानधनाचं टेन्शन वाढवणारी आहे.