प्राणी, पक्ष्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यांचे राहणीमान, जाेडीदार, घर बांधणी असं वेगळं असतं.
काही प्राणी, पक्ष्यांमध्ये वेगवेगळे जाेडीदार असतात. पण, काही प्राण्यांमध्ये मात्र एकच जाेडीदाराबराेबर ते आयुष्यभर राहतात.
लांडगा हा एकाच जाेडीदाराबराेबर दीर्घकाळ राहताे. नर, मादी एकत्र राहून ते एकमेकांची काळजी घेतात.
पेंग्विन हे आयुष्यभरासाठी एकाच जोडीदारा सोबत राहतात. ते एकत्र घरट बांधून राहतात, पिल्लांची काळजी घेतात.
हंस हा पक्षी देखील आयुष्यभर एकाच जाेडीदारा साेबत राहताे. हंसाला प्रेमाचे प्रतिक ही मानले जाते, म्हणून 'दाे हंसाे का जाेडा' असं म्हटलं जातं.
गिबन या प्रजातीची माकड, नर मादीची जाेडी नेहमी एकत्र राहतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात संघर्ष कमी हाेतात, ते आनंदाने एकत्र राहतात.
बीव्हर प्रजातीचे प्राणीही एकाच जाेडीदारा साेबत राहतात. एकत्र राहून ते घर बांधतात, नर - मादी एकत्र पिल्लांची काळजी घेतात.
मनुष्या प्रमाणेच हे प्राणी, पक्षी अगदी काळजीपूर्वक आपला जाेडीदार निवडतात आणि आयुष्यभर ते एकत्र राहून आनंदाने जगतात.