Tap to Read ➤

"माझा कारभार सोपा नसतोय रं...", गौतमीचा गावरान ठसका

भल्याभल्यांना आपल्या तालावर नाचवणारं नाव म्हणजे गौतमी पाटील.
ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
सोशल मीडिया स्टार, नृत्यांगणा गौतमी पाटील ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
यापूर्वी गौतमीची 'माझा कारभार सोपा नसतोय रं','दिलाचं पाखरू', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'पाटलांचा बैलगाडा' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
गौतमी अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने तिचे डान्स करतानाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये गौतमी कमालच दिसतेय. तिच्या ठसकेबाज अदांनी नेटकरी घायाळ झाले आहेत.
गौतमीच्या या व्हायरल फोटोंवर 'नाद खुळा लूक' , अशी मजेशीर कमेंट एका नेटकऱ्यांने केली आहे.