Tap to Read ➤
दीड कोटींचं सोनं, MC Stan रोज स्वत:वर करतो १.२० लाखांचा खर्च
बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅनची लाईफस्टाईल पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन उर्फ अल्ताफ शेख नुकताच 'बिग बॉस १६’ चा विजेता ठरला.
ज्या पद्धतीने तो चाहत्यांमध्ये आपली जबरदस्त पकड बनवली आहे, ते पाहता लोकांमध्ये त्याचा तुफान फॅन फॉलोइंग झाला आहे.
बिग बॉसमध्ये सर्वात लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे स्टॅनचे महागडे शूज, कपडे आणि दागिने.
नुकत्याच झालेल्या एका शोदरम्यान स्टॅनने त्याच्या शूज, दागिने आणि टी-शर्टची किंमत किती आहे हे सांगितलं.
एमसी स्टॅनच्या दोन बॅक-टू-बॅक हिट अल्बम 'तडीपर' आणि 'इंसान’नं त्याला प्रचंड प्रसिद्धी दिली.
'रॅग्स टू रिचेस' स्टॅनबद्दल अनेक गोष्टी समजून येतात.
दिवसाला केसांपासून शूज पर्यंत किती खर्च करतो असं एका आरजेनं विचारलं. यावर त्यानं दररोज १.२० लाख रूपये असं उत्तर दिलं.
यानंतर त्यानं आपल्या टी-शर्टची किंमत ४५ हजार असल्याचं सांगितलं. तसंच दागिन्यांची किंमत दीड कोटी असल्याचं तो म्हणाला.
त्याच्या शूजचीच किंमत ८० हजार रुपये आहे. याशिवाय त्यानं दुंबईच्या झीदा ज्वेलर्ससोबतही करार केलाय.
काही रिपोर्ट्सनुसा तो २.६७ कोटींची मर्सिडिज मेबॅक खरेदी करणार असल्याचंही म्हटलंय. त्याची एकूण संपत्ती २० कोटी रुपये आहे.
क्लिक करा