Tap to Read ➤

इंजिनिअर ते मोटिव्हेशनल स्पीकर, असा आहे गौर गोपाल दास यांचा प्रवास

अगदी सोप्या शब्दात आणि हसतखेळत ते जीवनाचा मार्ग दाखवत असतात.
गौर गोपाल दास यांना ओळखत नसेल अशी क्वचितच एखादी व्यक्ती आज सापडेल.
अगदी सोप्या शब्दांत आणि हसतखेळत प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या गौर गोपाल दास यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
अगदी मृदू वाणी आणि सुस्पष्ट विवेचन यामुळे जगभरात त्यांचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत.
२१ डिसेंबर १९७३ रोजी पुण्यात गौर गोपाल दास यांचा जन्म जाला.
महाराष्ट्रातच जन्म आणि शिक्षण असल्यामुळे ते इंग्रजी आणि हिंदीसोबत अस्खलीत मराठीही बोलतात.
लहानपणी लाडावलेल्या मुलाप्रमाणेच आपण खूप हट्टी होतो, पण हुशार असल्यानं ते चालूनही जायचं असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातील सेंट जूड हायस्कूलमधून झालं.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्यातून पुढील शिक्षण घेत इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि नोकरीचा मार्ग निवडला.
सुरुवातीला ते एचपी या कंपनीत कामालाही लागले. परंतु त्याच्या काही काळातच ते इस्कॉनशी जोडले गेले.
या काळात ते गुरू राधानाथ स्वामी यांच्या संपर्कात आले. आपल्याला वेळ देता यावा यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामाही दिला.
जवळपास १० वर्षांपर्यंत अध्यात्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली.
इस्कॉनमध्ये असताना, गौर गोपाल दास यांना कलिंगा सेंटर फॉर इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी एज्युकेशनकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाली.
गौर गोपाल दास यांचे आज सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
२०१६ मध्ये अध्यात्मिक क्षेत्रात आपलं योगदान दिल्याबद्दल त्यांना इंटरनॅशनल सुपर नॅचरल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं होतं.
क्लिक करा