Tap to Read ➤

WPL 2025 Auction : या स्टार महिला क्रिकेटर्संवर खिळतील सर्वांच्या नजरा

मिनी लिलावात कुणाला मिळेल सर्वाधिक भाव?
मिनी लिलावात भारतीय कॅप्ड खेळाडूंच्या यादीत स्नेह राणाही लक्षवेधी चेहरा ठरेल. ३० लाख मूळ किंमत असलेल्या बॉलिंग ऑल राउंडर खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझीमध्ये चुरस पाहायला मिळू शकते.
कॅरेबियन महिला संघातील स्टार महिला क्रिकेटर डिआंड्रा डॉटिन RCB नं रिलीज केलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. सर्वाधिक ५० लाख मूळ किंमत असलेल्या टॉप गटात तिचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं रिलीज केल्यावर पूनम यादवही ३० लाख या मूळ किंमतीसह लिलावात उतरली आहे.
इंग्लंडची हेदर नाइट ही गत हंगामात रॉयल चॅलेंजर्स संघाचा भाग होती. मिनी लिलावात ही अनुभवी खेळाडूही ५० लाख बेस प्राइज असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे.
गत हंगामात गुजरातच्या संघाकडून खेळताना दिसलेली मानसी जोशी ही देखील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. मध्यम जलदगती गोलंदाजी करणाऱ्या मानसीचा बेस प्राइज टॅगही ३० लाख इतका आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील लिझेल ली हिच्यासाठीही मिनी लिलावा बोली युद्ध रंगू शकते. बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये परफेक्ट असल्यामुळे तिला ५० लाख रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला, तर नवल वाटणार नाही. गत हंगामात ती गुजरात जाएंट्सच्या ताफ्यातून खेळताना दिसली होती.
अनकॅप्ड महिला खेळाडूंच्या यादीतून RCB च्या ताफ्यातून खेळताना दिसलेली ऑल राउंडर शुभा सतीश ही देखील लिलावातील एक लक्षवेधी चेहरा ठरेल.
क्लिक करा