भारताकडून वनडेत सर्वाधिक शतकासह सर्वाधिक षटकाराचा विक्रमही स्मृती मानधनाच्या नावे आहे.
स्मृती मानधना हिने श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत ११ वे शतक झळकावले.
भारताकडून सर्वाधिक शतके झळकावण्याचा रेकॉर्ड तिने आणखी मजबूत केलाय.
महिला क्रिकेटमध्ये वनडेत सर्वाधिक शतके झळकवण्यात ती मेग लेनिंग (१५) अन् सुझी बेट्स यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात स्मृतीच्या भात्यातून दोन उत्तुंग षटकारही पाहायला मिळाले. यासह तिच्या खात्यात ५५ षटकारांची नोंद झालीये.
महिला क्रिकेटमध्ये वनडेत भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्यातही ती अव्वलस्थानावर आहे.
या यादीत हरमप्रीत कौर ५२ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
रिचा घोष हिने आतापर्यंत वनडेत २० षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.