भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक वनडे शतक झळकवणाऱ्या बॅटरची यादी
भारतीय संघाची सलामीची स्फोटक बॅटर स्मृती मानधना हिने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
वनडे कारकिर्दीतील आठव्या शतकासह स्मृती मानधनाने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारतीय महिला संघाकडून वनडेत सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम आता तिच्या नावे झालाय.
याआधी हा विक्रम भारतीय महिला संघाची माजी स्टार बॅटर मिताली राज हिच्या नावे होता. वनडेत तिच्या खात्यात ७ शतकांची नोंद आहे.
महिला क्रिकेटमध्ये वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटर्सच्या यादीत स्मृती मानधना ही मेग लेनिंग, सुझी बेट्स टॅमी ब्युमॉन्ट आणि चामरी अट्टापट्टू यांच्यासह संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहे.
स्मृती मानधनानं ८८ व्या वनडे सामन्यात मितालीचा विक्रम मागे टाकताना १२२ चेंडूत १०० धावांची मॅच विनिंग खेळी केली.
भारताकडून वनडेत सर्वाधिक शतकं झळकवणाऱ्या यादीत हरमनप्रीत कौर ६ शतकांसह स्मृती आणि मिताली यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.
पुनम राउत हिने भारतीय महिला संघाचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या कारकिर्दीत ३ वनडे शतके झळकावली आहेत.