Tap to Read ➤

ऐकावं ते नवलच! गायिकेकडे ३४७३ बाहुल्यांचं कलेक्शन, भावनिक आहे कारण

बाहुल्यांच्या कलेक्शन मागे आहे मोठं कारण
गायिका पलक मुच्छालच्या घरात एक अशी जागा आहे जिथे खूप बाहुल्या पाहायला मिळतात. एवढ्या बाहुल्याचं कलेक्शन करण्यामागे काय कारण असेल.
यामागचं पलकने हैराण करणारे कारण सांगितले आहे. यामागचे खूप मोठे भावनिक कारण आहे.
पलककडे ३४७३ बाहुल्यांचं कलेक्शन आहे. तिने सांगितले की, प्रत्येक डॉलची स्वतःची अशी कहाणी आहे.
पलकने म्हटलं की, या बाहुल्या त्या लोकांना रिप्रेजेंट करतात ज्यांचा जीव खूप मेहनतीच्या कमाईतून वाचवला आहे. त्यांच्यासाठी माझ्या मनात खास जागा आहे.
पलककडे असलेल्या प्रत्येक बाहुल्यांची वेगवेगळी कहाणी आहे.
जेव्हा पलक कोणत्या हार्ट पेशंटची सर्जरी करते, तेव्हा ती तिच्या कमाईतील काही हिस्सा देते. मग त्या व्यक्तीचे नाव ती बाहुल्याला देते. असे ती गेल्या २५ वर्षांपासून करते आहे.
खूप लहान असताना तिने हे मिशन सुरू केले होते. आतापर्यंत तिने ३४७३ मुलांचे प्राण वाचविले आहेत. प्रत्येक सर्जरीच्या बदल्यात बाहुल्या जमा करते.
पलक २००० सालापासून तिचा चॅरिटी शो दिल से दिल तकसाठी देशविदेशात टूर करते.
पलकसोबत तिचा छोटा भाऊ पलाशदेखील लहान मुलांच्या किडनी समस्येसाठी निधी गोळा करतो. तो देखील सिंगर आहे.
क्लिक करा