चहा आवडतो? थांबा, आधी त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम तरी जाणून घ्या

अनेक जण दिवसातून ३-४ वेळा सहज चहा पितात. 

चहाप्रेमींची जगात काही कमी नाही.  त्यामुळेच बाजारातही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, फ्लेवर्सचे चहा सहज मिळतात.

अनेक जण दिवसातून ३-४ वेळा सहज चहा पितात. परंतु, या चहाचे काही दुष्परिणामही आहेत.

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने किंवा जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने ऍसिडिटी, गॅस, अपचन आणि छातीत जळजळ यांसारखी समस्या निर्माण होते.

चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त चहा प्यायल्यास निद्रानाश होऊ शकतो.

चहामध्ये 'टॅनिन' नावाचा पदार्थ असतो, जो शरीरात लोह आणि कॅल्शियमचे शोषण करतो. यामुळे ॲनिमिया किंवा हाडे ठिसूळ होण्याची शक्यता वाढते. 

चहामध्ये साखर मिसळून प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचायचं असेल तर आहारात करा 'या' ५ पदार्थांचा समावेश

Click Here