डायजेस्टिव बिस्कीट खाताय? त्याचेही आहेत साईड इफेक्ट्स

डायजेस्टिव बिस्किटांमुळे होतात पोटाचे विकार?

बिस्कीट खाण्याचे तोटे सगळ्यांनाच ठावूक आहे. परंतु, मैद्यापासून तयार केलेल्या बिस्कीटांना सध्या बाजारात डायजेस्टिव बिस्कीट हा नवीन पर्याय दिसून येत आहे.

अनेकदा आपण हेल्दी म्हणून डायजेस्टिव बिस्कीट खातो. परंतु, या बिस्किटांमुळेही अनेक शारीरिक समस्या उद्भवतात.

डायजेस्टिव बिस्कीट तयार करतांना त्यात ग्लुटेन वापरलं असतं. प्रत्येक ब्रँडच्या बिस्कीटात हे प्रमाण वेगवेगळं असतं. जर तुम्हाला ग्लुटेनची अॅलर्जी असेल तर मग जुलाब,पोटदुखी, गॅस यांसारखा त्रास होऊ शकतो.

डायजेस्टिव बिस्कीटांमध्ये सॅच्युरेटेड फॅट व फॅटच्या दुस-या पर्यायांचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल, पोटासंबंधीच्या तक्रारी होऊ शकतात.

डायजेस्टिव बिस्कीटांमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. हे प्रिझर्वेटिव्ह जास्त काळ पोटात गेल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

डायजेस्टिव बिस्किट हे दुस-या बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात. पण यामध्ये नैसर्गिक स्वीटनर्ससोबतच साखरेचाही वापर केला जातो. त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह यांसारखे आजार होण्याचा धोका असतो.

बजेट फ्रेंडली इंटरनॅशनल टूर, 80 हजारात फिरु शकता हे देश

Click Here