Tap to Read ➤

गिल ते तेंडुलकर! वनडेत जलद ८ शतके झळकवणारे आघाडीचे ५ भारतीय फलंदाज

शुबमन गिल हा सर्वात जलदगतीने आठ वनडे शतके झळकवणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. एक नजर खास रेकॉर्डवर
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शुबमन गिलनं नाबाद शतकी खेळी साकारली. वनडेतील आठवे शतक झळकवताना त्याने खास विक्रमाला गवसणी घातलीये.
शुबमन गिल हा वनडे कारकिर्दीत भारताकडून सर्वात जलदगतीनं ८ शतके झळकवणारा खेळाडू ठरलाय.
इथं एक नजर टाकुयात कमी डावात ८ शतके झळकवणाऱ्या आघाडीच्या ५ भारतीय फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर
शुबमन गिलनं वनडे कारकिर्दीतील ५१ डावात आठवे शतक झळकवण्याचा डाव साधलाय. भारताकडून हा टप्पा त्याने सर्वात जलदगतीनं गाठला आहे.
या यादीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. गब्बर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवन याने ५७ डावात ८ शतके झळकावली होती.
वनडे कारकिर्दीत सर्वाधिक शतकांचा विक्रम नावे केलेल्या किंग कोहलीनं ६८ डावानंतर ८ शतके झळकावली होती.
या यादीत गौतम गंभीरचाही टॉप ५ मध्ये समावेश आहे. त्याने ९८ डावानंतर ८ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पहिल्या ८ वनडे शतकासाठी १११ डाव खेळले होते.
क्लिक करा