शुभांगी अत्रेचा झाला घटस्फोट, म्हणाली - ''लग्न वाचवण्याचा केला पूर्ण
शुभांगी अत्रेने २००३ साली पियुष पुरीसोबत लग्न केले होते. त्यांना १८ वर्षांची मुलगी आहे.
शुभांगी अत्रेने २००३ साली पियुष पुरीसोबत लग्न केले होते. त्यांना १८ वर्षांची मुलगी आहे.
२०२२ साली शुभांगी पतीपासून विभक्त झाली. मात्र तिने लेकीच्या संगोपनासाठी पियुषसोबत घटस्फोट घेतला नव्हता.
शुभांगी अत्रेने जेव्हा लग्न केले होते, तेव्हा तिचं वय २० वर्ष होतं. त्यांची लव्हस्टोरी शाळेत असताना सुरू झाली होती. दोघे मित्र होते आणि मग त्यांना प्रेम झाले.
शुभांगीने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने लग्न वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही.
शुभांगीने लग्न तुटण्यामागचे कारण सांगितले नाही. पण इतकं नक्की सांगितलं होतं की, एकमेकांबद्दलचा सन्मान, मैत्री आणि विश्वासाच्या जोरावर लग्न टिकून राहते.
शुभांगीने पुढे म्हटले की, मला आणि पियुषला नंतर जाणीव झाली की, आमच्यात आपापसात मतभेद आहेत. ते आम्ही सोडवू शकत नाही. त्यामुळे एकमेकांना स्पेस देणं योग्य आहे.
शुभांगीच्या नवऱ्याने तिला करिअरमध्ये खूप पाठिंबा दिला होता. तिने सांगितले होते की, जेव्हा ती २ वर्षांच्या मुलीला घरात सोडून शूटवर जायची तेव्हा तिचा नवरा तिला सांभाळायचा. शुभांगीची मुलगी अमेरिकेत एस्ट्रोफिजिक्सचे शिक्षण घेत आहे
दुसऱ्यांदा लग्न करणार का, असे विचारल्यावर शुभांगी म्हणाली की, आता हे परत होऊ शकत नाही. ती परत कोणाच्या प्रेमात पडू शकणार नाही.