Tap to Read ➤

श्रुती शर्माला कशी मिळाली 'हीरामंडी'ची 'साइमा'?

सध्या संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'ची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
हीरामंडी वेबसीरिजमधील मुख्य भूमिकांव्यतिरिक्त साइमा या पात्राचेही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. साइमाची भूमिका अभिनेत्री श्रुती शर्मा हिने साकारली आहे.
मालिकेच्या सेटवर शूटिंगसाठी तयार झाल्यानंतर तो लूक पाहून तिच्या मनात विचार आला की, ती भन्साळींच्या सिनेमातील पात्रासारखी वाटतेय आणि जर त्यांच्या प्रोजेक्टमध्ये मला घेतलं तर.
एका महिन्यांच्या आत तिची हीरामंडीसाठी निवड झाली. ती सांगते की, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भाग आहे.
खरेतर साइमाच्या भूमिकेच्या ऑडिशनसाठी कॉल आला होता तेव्हा ती नमक इश्क का मालिकेचं शूटिंग करण्यात व्यग्र होती.
श्रुती महाजनच्या टीमकडून श्रुती शर्माला कॉल आला होता, त्यांनी सांगितले की, एक रोल आहे आणि त्यासाठी तुला अभिनयासोबत गाणं गायचंय.
तेव्हा कशासाठी ऑडिशन आहे, हेदेखील माहित नव्हते, असे अभिनेत्रीने सांगितले.
ऑडिशननंतर दुसरा राउंड झाला, रिडिंग झाले आणि माझी या सीरिजसाठी निवड झाल्याचे श्रुतीने सांगितले.
श्रुती शर्मा म्हणाली की, अजूनही माझा विश्वास बसत नाहिये की हे खरे झाले आहे आणि मी संजय लीला भन्साळींच्या हीरामंडीमध्ये काम केलंय.
क्लिक करा