Tap to Read ➤

श्रावणी शुक्रवार: ‘या’ पद्धतीने करा पूजन; लक्ष्मी देवी अपार कृपा करेल

श्रावणी शुक्रवारी केलेले लक्ष्मी पूजन विशेष मानले जाते.
लक्ष्मी प्रसन्न झाल्यास कधीही पैशांची चणचण भासत नाही, अशी मान्यता आहे. शुक्रवार लक्ष्मी देवीला समर्पित मानतात.
शुक्रवारी लक्ष्मी पूजन केल्यास धनप्राप्ती होत असल्याचे मानले जाते. शुक्रवारी व्रत केल्यास लक्ष्मी देवीचा आशिर्वाद मिळतो.
लक्ष्मी पूजन करताना तिच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. कमळाचं फूल, लाल गुलाब, पांढरी मिठाई अर्पण करावी.
श्रावणी शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा विधीनुसार करावी. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यानंतर श्रीसूक्ताचे पठण करावे.
आर्थिक संकटात असाल तर दर श्रावणी शुक्रवारी लक्ष्मी स्त्रोत पाठ करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त ठरू शकते.
या दिवशी पांढरे वस्त्र, तांदूळ, तूप, कापूर, साखर, श्रृंगाराचे साहित्य, दही दान करणेही अत्यंत लाभदायक मानले जाते.
हा दिवस शुक्र ग्रहासाठी समर्पित मानला गेला असल्याने शुक्र मंत्र जपणे, शुक्राशी संबंधित वस्तूंचे दान करणे हिताचे ठरेल.
यासह लक्ष्मी देवीच्या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. लक्ष्मी स्तोत्रांचे पठण शक्य नसेल तर श्रवण आवर्जून करावे.
श्रावणी शुक्रवारी जरा-जिवंतिकेचे पूजन करावे. तिन्ही सांजेला लक्ष्मी देवीसमोर दिवा लावावा. तुळशीसमोर दिवा लावावा.
सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.
क्लिक करा