Tap to Read ➤
अजा एकादशी: तिरुपती बालाजीचा १ मंत्र म्हणा; अपार पुण्य अन् लाभ मिळवा
श्रावणातील अजा एकादशीला तिरुपती बालाजी मंत्र जप लाभदायी ठरु शकतो.
निज श्रावण महिन्याची सांगता होत आहे. श्रावण वद्य पक्षातील एकादशी रविवार, १० सप्टेंबर रोजी आहे.
एकादशी तिथीला श्रीविष्णूंची आराधना, पूजन, मंत्रपठण, नामस्मरण अतिशय शुभ-लाभदायी असल्याचे म्हटले जाते.
तिरुपती बालाजीचा महिमा, महात्म्य अगाध असल्याचे म्हटले जाते. कोट्यवधी भाविक तिरुपती बालाजी चरणी नतमस्तक होतात.
दक्षिण भारतात स्थित तिरुपती बालाजी भगवान विष्णूचे दुसरे रूप मानले जाते. हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट जगात दुसरे सर्वात श्रीमंत ट्रस्ट आहे. तिरुपती व्यंकेटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन या ट्रस्टकडे आहे.
तिरुपती बालाजीचे दिव्य अन् भव्य मंदिर आजही दक्षिण भारतीय स्थापत्य आणि शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
दरवर्षी २.५ कोटींहून भाविक तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येथील केशदानाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
तिरुपती बालाजीचा एकच मंत्र अतिशय प्रभावी असल्याचे म्हटले जाते. अधिक मासात या मंत्राचे पठण अत्यंत पुण्यदायी मानले गेले आहे.
तिरुपती बालाजी या मंत्राने प्रसन्न होतात. या मंत्राच्या माध्यमातून तिरुपती बालाजीविषयी श्रद्धा, आस्था व सन्मान प्रकट केला जातो.
तिरुपति बालाजीचा हा मंत्र अतिशय प्रभावशाली असल्याचे म्हटले जाते. अनामिक भीती दूर होऊन शरिरात एक अद्भूत ऊर्जा संचारते.
या मंत्राच्या पठणामुळे मन अन् चित्त शांत होते. अध्यात्मिक समृद्धता प्राप्त होऊ शकते. चैतन्याचा अनुभव करता येऊ शकतो.
या मंत्राच्या स्पष्ट आणि अचूक उच्चारणामुळे तिरुपती बालाजीच्या साधनेत तल्लीन अन् ध्यानस्थ होता येऊ शकते, असे म्हटले जाते.
ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः । श्रीमन नारायण नमो नमः ।। तिरुमल तिरुपति नमो नमः । जय बालाजी नमो नमः ।। असा हा मंत्र आहे.
या मंत्राचे १०८ वेळा किंवा यशाशक्ती नामस्मरण केल्यास तिरुपती बालाजीची अपार कृपा-लाभ, शुभ-पुण्य फल मिळू शकतात, असे सांगितले जाते.
क्लिक करा