Tap to Read ➤
Share Market चं ज्ञान : अपर आणि लोअर सर्किट म्हणजे काय रे भाऊ?
शेअर्सना अपर आणि लोअर सर्किट लागतं म्हणजे नक्की काय होतं, पाहा...
शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर वर जात असेल तेव्हा त्याला विशिष्ट मर्यादेनंतर अपर सर्किट लावलं जातं.
तर एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंत शेअर खाली घसरल्यानंतर त्या शेअरला लोअर सर्किट लावलं जातं.
सेबीकडून शेअर्ससाठी टक्क्यांमध्ये अपर किंवा लोअर सर्किटची मर्यादा निश्चित केली जाते.
शेअरमधील अपर किंवा लोअर सर्किट हे ५,१०,१५,२० टक्क्यांचं असू शकतं.
५ टक्क्यांच्या अपर सर्किटचा अर्थ शेअरची किंमत ५ टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतर त्याची खरेदी विक्री बंद होते.
अशाच प्रकारे १०,१५ आणि २० टक्क्यांचं अपर सर्किटही काम करतं. या उलट लोअर सर्किटमध्ये असतं.
जर एखादा शेअर त्याच्या ५,१०,१५,२० टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत घसरला तर त्यात लोअर सर्किट लावलं जातं.
अपर किंवा लोअर सर्किट लागल्यानंतर बहुतांश वेळा त्यात ट्रेडिंग दुसऱ्या दिवशी सुरू होतं.
क्लिक करा