Tap to Read ➤

याला म्हणतात परतावा...! छोट्या कंपनीचा शेअर 4 वर्षांत 6300% वाढला...

आता 1 वर 1 बोनस शेअर देण्याची घोषणा...
मल्टीबॅगर कंपनी ओरियनप्रो सॉल्यूशन्सच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे.
कंपनीचा शेअर बुधवारी 5 टक्क्यांच्या तेजीसह 2634 रुपयांवर पोहोचला.
या शेअर्समध्ये ही तेजी एका मोठ्या घोषणेनंतर आली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना 1:1 प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
या शेअरने गेल्या केवळ 4 वर्षांत 6300 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
कंपनीचा शेअर 7 मे 2020 रोजी 40.15 रुपयांवर होता. तो15 मे 2024 रोजी 2634 रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2799.65 रुपये आहे. तर निचांक 496.35 रुपये आहे.
या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 370% हून अधिक वाढ झाली आहे. 15 मे 2023 रोजी कंपनीचा शेअर 551.45 रुपयांवर होता, तो 15 मे 2024 रोजी 2634 रुपयांवर पोहोचला.
टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.
क्लिक करा