'डंकी' हाउसफुल होणार, रिलीजपूर्वीच शाहरुख खानने व्यक्त केला विश्वास...
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' 21 डिसेंबरला रिलीज होत आहे.
Shahrukh Khan: 'पठान' आणि 'जवान'च्या जबरदस्त यशानंतर शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'डंकी' चित्रपटातून किंग खान बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच 'डंकी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. त्यानंतर आता पहिले गाणे 'लूट पुट गया' आज रिलीज झाले, आणी हे इंटरनेटवर ट्रेंड करत आहे.
दरम्यान, ट्विटरवर 'ask SRK' मध्ये शाहरुख अनेकदा त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देतो. अलीकडेच त्याने आस्क एसआरकेमध्ये चाहत्यांच्या मनोरंजक प्रश्नांची उत्तरे दिली.
एका चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना, शाहरुख खानने 'डंकी' रिलीज होण्याच्या एक महिना आधीच हा चित्रपट हाऊसफुल्ल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
एका चाहत्याने किंग खानला विचारले की, 'सर, मी 'डंकी'साठी फ्रंट सीट बुक करू की कॉर्नर सीट? या प्रश्नाचे शाहरुख खानने त्याच्या मजेदार शैलीत उत्तर दिले.
शाहरुख म्हणाला, 'भाई, मला विश्वास आहे की चित्रपट हाऊसफुल जाईल, तुला सीट मिळणार नाही. त्यामुळे तू घरुनच सोफा घेऊन ये.' चाहत्यांना किंग खानचे हे उत्तर खूप आवडले आहे.
आणखी एका चाहत्याने त्याला 'डंकी' या चित्रपटाचे नाव देण्यामागचे कारण विचारले. 'डंकी हा सीमेपलीकडील बेकायदेशीर प्रवासाचे वर्णन करणारा एक शब्द आहे,' असे उत्तर शाहरुखने दिले.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' 21 डिसेंबरला रिलीज होत आहे. चित्रपटाची कथा राजकुमार हिरानी, अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिली आहे.