Tap to Read ➤

दर महिन्याला ₹५००० ची गुंतवणूक, झाले ४९ लाख; SBI ची तुफान स्कीम

एसबीआयच्या म्युचुअल फंडानं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिलेत.
एसबीआयच्या म्युचुअल फंडानं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिलेत. ही स्कीम एसबीआय स्मॉल कॅप फंड आहे.
९ सप्टेंबर २००९ मध्ये ही स्कीम लाँच करण्यात आली होती. जर यात कोणी दर महिन्याला ५ हजारांची गुंतवणूक केली असती तर गुंतवणुकीचं मूल्य ४९.४४ लाख झालं असतं.
या १४ वर्षांच्या कालावधीत ५ हजारांनुसार तुमची एकूण गुंतवणूक केवळ ८.४० लाख रुपये असेल. यात तुम्हाला तब्बल ४१.०४ लाखांचा फायदा झाला असता.
एसबीआयच्या सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅननं २२.८५ टक्के सीएजीआरच्या हिशोबानं रिटर्न दिलेत. सीएनबीसीच्या एका रिपोर्टमध्ये हे नमूद करण्यात आलंय.
जर एनएफओदरम्यान तुम्ही यात एकत्र १० लाखांची गुंतवणूक केली असती, तर आज याचं मूल्य १.३७ कोटी रुपये असतं.
एसबीआय स्मॉल कॅप फंडाचं असेट अंडरमॅनेजमेंट २० हजार कोटी रुपयांपर्यंत गेलंय. स्कीम अंतर्गत ६५ टक्के असेट्स स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये लावले जातात.
टीप - यामध्ये फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. गुंतवणूकीपूर्वी तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
क्लिक करा