Sarfaraz Khan सह इराणी कप स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या करणारे ७ फलंदाज
अशी कामगिरी करणारा पहिला 'मुंबईकर' ठरला सर्फराज
इराणी कप २०२४ स्पर्धेत सर्फराज खान याने विक्रमी कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत मुंबईकडून द्विशतकी खेळी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
शेष भारत विरुद्धच्या सामन्यात सर्फराज खान याने २८६ चेंडूत २५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद २२२ धावांची खेळी केली.
इराणी कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो टॉप ५ मध्ये पोहचला आहे. एक नजर या स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या आघाडीच्या ७ फलंदाजांवर
इराणी कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वासीम जाफर अव्वलस्थानी आहे. २०१८ मध्ये विदर्भ संघाकडून त्याने शष भारत संघाविरुद्ध २८६ धावांची खेळी केली होती.
शेष भारत संघाकडून खेळताना मुरली विजय याने २०१२ च्या हंगामात राजस्थान संघाविरुद्ध २६६ धावांची खेळी केली होती.
१९९० च्या हंगामात प्रवीण आमरे या दिग्गजाने शेष भारत संघाकडून खेळताना बंगाल विरुद्धच्या सामन्यात २४६ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते.
१९८० च्या हंगामात दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या सुरिंदर अमरनाथ यांनी शेष भारत विरुद्धच्या लढतातीत नाबाद २३५ धावांची खेळी केली होती.
मुंबईकडून खेळताना सर्फराज खान याने शेष भारत विरुद्ध २२२ धावांच्या नाबाद खेळीसह इराणी कप स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या फलंदाजाांच्या यादीत टॉप ५ मध्ये एन्ट्री मारली आहे.
या यादीत रवी शास्त्रींचाही समावेश आहे. १९९० मध्ये शेष भारत संघाक़ून खेळताना या दिग्गजाने बंगाल विरुद्धच्या सामन्यात २१७ धावांची खेळी केली होती.
गतवर्षी म्हणजे २०२३ च्या हंगामात यशस्वी जैस्वाल याने शेष भारत संघाकडून खेळताना मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात २१३ धावा केल्या होत्या.